ट्रेकिंग


                   ट्रेकिंग

नविन पिढीची नवी हौस म्हणजे ट्रेकिंग.आणि प्रत्येक जण ही हौस.भागवण्यासाठी ट्रेकला जात असतो.आधी लोक सुट्टी दिवशी मस्त पैकी झोपा काढत. परंतु आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे ,लोक ट्रेकिंगला जातात ती हौस म्हणून नाही तर दंगा करण्यासाठी.खुपच थोडी लोक अशी आहेत ती खरोखरच आनंद घेण्यासाठी जातात. परंतु या ट्रेकिंग क्षेत्रात आपण आपले करिअर सुध्दा करू शकतो असं जर तुम्हांला सांगितले तर तुम्हाला खोटं वाटेल, पण याचं उत्तर हो आहे. परंतु फारचं थोड्या लोकांना याची माहिती आहे. आणि या कोर्स चे प्रशिक्षण उत्तर भारतात दिलं जातं.आणि भरपूर संस्था या भागात आहेत आणि  या सर्व कोर्सेस चे प्रशिक्षण 28 दिवसांच असतं. परंतु फारच थोड्याजणांना याची माहिती आहे व ते याचे प्रशिक्षण घेतात. परंतु कामधंद्यामुळे सर्वाना याचे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. या सर्वान साठी गिरीप्रेमी संस्थेनै सहा दिवसांचा कोर्स सूरू केला आहे.हा सर्व कोर्स सिंहगडावर चालतो यात आपण राँकक्लँमबिंग, रँपलिंग,जुमारिंग,टेन्ट पिचिंग, रोपचे प्रकार, आणि सर्व साधनांची माहीत दिली जाते.  सगळआणि सर्वात शेवटी परिक्षा घेतली जाते.त्यानंतर सर्वाना प्रशस्तीपत्रक दिले.हा कोर्स सर्वानी केला पाहिजे असे मी सर्वाना सांगेल.
 फार वर्षा पूर्वी दुरदर्शन वर एक जाहिरात दाखवली जायची,त्यात तीन माणसं दोरीच्या साह्याने उंच डोंगर चढत असताना दाखवायचे ती जाहिरात कुठली होती आता माहीत नाही,परंतु आपण सूध्दा एगदा हे कराव असं वाटायचं. हळूहळू मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली.
मध्यंतरी एक्सप्लोरर बरोबर ढाक बहिरी ला त्यानंतर लोणावळा इथे मी Rappelling  केलं.मला हे इतक आवडलं कि मी मागील डिसेंबर महिन्यात याच सहा दिवसांच प्रशिक्षण घेतलं.
  यात आपल्याला साधनांची माहीत मिळते, ते कुठे वापरले जातात,ती कशी वापरली जातात हे आपण शिकतो


Comments